Wednesday, October 23, 2013

माकड आणि आरसा...

 

 माकड आणि आरसा




Friday, April 5, 2013

दोन मने

१. मनुष्य दैवाच्या हातचे बाहुले नसला तरी नशीब हेही काही माणसाच्या मांडीखालचे घोडे नव्हे.

२. घरसुद्धा पुरते न उजळणारी पणती होण्यात काय अर्थ आहे? क्षणभर का होईना, ब्रम्हांड उजळून टाकणाऱ्या विजेप्रमाणे चमकून जावे.

३. रोग लपविला, योग्य वेळी औषध घेतले नाही म्हणजे शेवटी शस्त्रक्रियेची पाळी येते. शरीराच्या बाबतीतच माणसावर हि पाळी येते असे नाही, मनावरही ती येते.







लेखक: वि. स. खांडेकर.
पुस्तक: दोन मने




Tuesday, March 26, 2013

जिप्सी

१. जरी तुझीया सामर्थ्याने, ढळतील दिशाही दही
    मी फूल तृणातील इवले, उमलणार तरिही नाही.

२. तूं तुलाच विसरून यावे, मी तुझ्यात मज विसरावे
     तू हसत मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे.

३. व्योमांतुन उडतांना, ओढीतसे मज घरटे
    अन उबेत घरट्याच्या, क्षुद्र तेच मज गमते.
    हे विचित्र दु:ख असे, घेऊनि उरी मी जगतो
    घरट्यातून, गगनातुन, शापित मी तगमगतो.

४. असे भिडावे, नकळत क्षणभर अपुले डोळे
    उमलुन यावें, हृदयांतील हितगुज मोकळे

५. माझे दूरचे क्षितीज तुझ्या नेत्री बुडलेले;
    पापण्यांत, बांधणारे, एक स्वप्न दडलेले
    दान स्वप्नांचे देऊन, जाग माझी मागू नको
    माग हवे तें गडे तूं, माझे पंख मागू नको!

६. इतके आलो जवळ जवळ कीं जवळपणाचे झाले बंधन.








 कवी: मंगेश पाडगावकर

पुस्तक:  जिप्सी

Friday, March 8, 2013

काही खर काही खोट

१. आयुष्यातल्या कोणत्याही सुखाला कवटाळून झाल्यावर त्या क्षणांच्या आठवणीने चोरटेपणा न वाटता जास्त आनंदच जेव्हा वाटत राहतो तेच खरं सुख.

२. देव पाठीराखा असतो तेव्हाच असामान्य संकटं येतात. सामान्य संकटं निवारण्यात त्याचही देवत्व सिद्ध होणार नाही.

३. कर्तृत्ववान व्यक्तीचा पराक्रम बघितला जात नाही, त्याचं चाक जमिनीत कधी रुततं तिकडेच सगळ्यांच लक्ष असतं.

४. वारंवार प्रकट झाल्याशिवाय जे शांत होत नाही किंवा वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्यालाच शल्य म्हणतात.



लेखक:  व.पु. काळे
पुस्तक: काही खर काही खोट

Wednesday, February 27, 2013

तोच चंद्रमा

१. सारे जरि ते तसेच धुंदी आज ती कुठे?
    मीहि तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे?
    ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
    एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

२. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
     अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
     जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्याला
     माझ्या मनातला का तेथे असेल रावा?

३. काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
    मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे!

४. मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
     घर पान्यामंदी बंदराला करतो ये जा!


कवयित्री: शांता शेळके
पुस्तक: तोच चंद्रमा



Sunday, February 24, 2013

व्यक्ती आणि वल्ली

१. मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांचे 'भय्या' आणि 'मद्राशी' असे दोन स्थल विभाग मी करू शकतो. विभाग जरा स्थूल वाटला तर 'वानियाभय' असेल असा अंदाज. ह्या वानियाभायामध्ये मारवाड, गुजरात, बंगाल सारे येतात. 'शीख' ओळखता येतो; पण कालचा शीख आज ओळखता येत नाही."
२. "अहो कसला गांधी? जगभर गेला; पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमकं ठाऊक इथं त्याच्या पंच्याच कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्यापेक्षाही उघडे! शुताबितात तथ्य नाही हो! आमचा शंभूभट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटीश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील कधी घाबरला नाही! तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं! इथे निम्मं कोकण उपाशी! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक, आम्हास कसलं"?






लेखक: पु. ल. देशपांडे
पुस्तक: व्यक्ती आणि वल्ली













Thursday, February 7, 2013

विधवा कुमारी

१. खोटं म्हणजे काय?
    जे माणसाला सुचतं, पण देवाला रुचत नाही ते खोटं.




लेखक:  मामा वरेरकर.
पुस्तक: विधवा कुमारी.









Sunday, January 27, 2013

बाई, बायको, कॅलेंडर






१. दात जिभेला म्हणतात,
 'हम बत्तीस तू अकेली, बसी हमारी माय..
 जरासी कतर खाउं तो फिर्याद कहां ले जाय?'
त्यावर जीभ म्हणते,
 'मानती हुं मैं अकेली, तुम बत्तीस, बसी तुम्हारी माय
जरासी तेढी बात करूं तो बात्तीसही गिर जाये.'



लेखक:  व. पु. काळे.
पुस्तक: बाई, बायको, कॅलेंडर








Friday, January 11, 2013

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... ६


४१. रीमा लागू.


४२. अमृता पत्की.


४३. स्मिता जयकर.


४४. कार्तिका राणे.


 ४५. सयाली भगत


४६. विद्या मालवदे.


४७. मृण्मयी लागू.










Saturday, January 5, 2013

अमृतवेल

१. स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे; पण माणसाचं मोठेपण, आपल्या वाटेला आलेलं सारं दु:ख पाहून नवी स्वप्न पाहण्यात आहे... हलाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.
२. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो! पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही, अशी एक अंध, अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने! वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात. तसेच या अफाट जगात घडते.
 
 
 
३. जगात दोन जाती आहेत माणसांच्या. एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुर्दाड मनांची. मुर्दाड माणसं अष्टौप्रहर जगण्याची केविलवाणी धडपड करत राहतात. ती कुणाच्याही लाथा खातील, सोम्यागोम्यापुढे लोटांगण घालतील. उकिरड्यावर उष्ट्या अन्नांनी पोट भरतील; पण काही करून कुडीत जीव राहील, अशी काळजी घेतील. त्यांना सर्वात मोठं भय वाटतं ते मरणाचं! मनस्वी मनं तशी नसतात. मनानं आणि अभिमानानं जगता आलं, तरच ती जगतील. ती धुंदीत जगतील, मस्तीत जगतील; पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत. ईश्वराशीसुद्धा तडजोड करणार नाहीत. त्यांची स्व:तशी तर सदैव झुंज चाललेली असते.
४. आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत  नाही.







लेखक: वि. स. खांडेकर.
पुस्तक: अमृतवेल

Video